प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बेजबाबदारपणा करणार्‍या पंजाब सरकारच्या निषेधार्थ भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मुक धरणे आंदोलन

नांदेड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौरा कार्यक्रमात पंजाब मध्ये सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणार्‍या काँग्रेस च्या पंजाब सरकारच्या निषेधार्थ भाजपा अनुसुचित जाती मोर्चा तर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मुक धरणे आंदोलन करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब राज्यातील विकास कामाचा शुभारंभ व विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यासाठी पंजाबला गेले असता तेथील कांग्रेस प्रणित राज्य सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अडथळा निर्माण करण्यासाठी आपल्या काही भाडोत्री गुंडासह कांग्रेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून बनावट शेतकरी बनवून रास्ता रोको आंदोलन करण्याची मुभा दिली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभेला जाण्यास अडथळा निर्माण झाला, सदरील घटनेचा देश विदेशातील सर्व स्तरातून याबद्दलही पंजाबच्या चन्नी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर आज नांदेड शहरतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य मिलिंद देशमुख, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, सरचिटणीस दिलीप ठाकुर, धिरज स्वामी, मधुकर मानेकर, आशीष नेरलकर, केदार नादेडकर, महादेवी मठपती, रामराव पाष्ठे, राज यादव, सोनू उपाध्याय, कामाजी सरोदे, दिलीप सावंत, राहुल कदम आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बेजबाबदारपणा करणे हे अतिशय असमर्थनीय व निदंनिय आहे. या प्रकाराच्या विरोधात भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्या वतीने दि. 6 जानेवारी रोजी पंजाब सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच या विषयी राज्यपालांना निवेदन जिल्हा अधिकारी मार्फत देण्यात आले होते तर आज मुकधरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी दिली.