आरोपी ना तात्काळ अटक करा अंन्यथा आदोलन करणार — निखिल लातूरकर यांनी मागणी केली .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य श्री हेडगेवार यांच्या गावातील घटना.

धर्माबाद : धर्माबादपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील रेंजर मंडळ येथील कंदाकुरती या गावात काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली असून अत्यंत पुरातन वारसा असलेल्या राम मंदिरात ही चोरी झाली असून अत्यंत मौल्यवान अशा पंचधातूच्या मिश्रित असलेल्या व काही मुर्त्यावर चांदीचा लेप केलेल्या अशा मुर्त्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

कंदाकुर्ती हे गोदावरीतीरावर तेलंगणात वसलेलं अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला लाभलेले गाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे जन्मस्थळ हेच कंदाकुरती गाव असल्याने या गावा शेजारी अनेक सुंदर मंदिर आहेत त्यातल्या एक पुरातन श्रीराम मंदिरात अत्यंत देखणे आशा असलेल्या भगवान श्रीरामाच्या मुर्त्या व अन्य देवतांच्या मूर्त्या होत्या हि चोरी नियोजनबद्ध रीतीने सराईत चोरांनी केल्याचे प्राथमिक दृश्यावरून दिसते.चोरीची माहिती मिळताच रेंजर येथील पोलीस निरीक्षक तात्काळ घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला व महाराष्ट्राच्या सीमेवरील सर्व ठाण्याला सीमेवरच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्याची ही विनंती केली .अत्यंत मौल्यवान अशा मुर्त्या झालेली चोरी या गावकऱ्यांसाठी एक धक्काच असल्याचेही गावकऱ्यांनी बोलून दाखवले.