लोहा:

पाच वर्षा पूर्वी ज्यांना निवडून आणण्यासाठी. जिवापाड प्रयत्न केले .त्याच कार्यकर्त्यांवर या पाच वर्षात त्या कारणाने पोलीस गुन्हे दाखल करायला लावले. पाच वर्षाचा राजकीय वनवास’ संपणार. एकजुटीने…,एकमतानं.., एक विचारानं प्रतापरावाच्या पाठीशी आपण उभे आहोत. सामान्य …जनताही आपल्या “हक्काच्या माणसा”साठी खंबीरपणे साथ देणार असे

आवासक चित्र वाढदिवसाच्यानिमिताने दिसले. अभूतपूर्व. अविस्मरणीय स्वागताच्या अलोट गर्दीने हे दाखवून दिले. लोहा- कंधार तालुक्याने आपल्या लाडक्या नेत्यावर गुलाब,पुष्प व शुभेच्छाचा वर्षाव करत येत्या निवडणूकीत प्रतापरावां शिवाय पर्याय नाही असाच ठोस संदेश दिला आहे

 

लोहा तालुक्यात व शहरात नियोजित मार्गावर जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने जागोजागी.. गावोगावी..तसेच ..शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते-पदाधिकारी -व्यापारी- सामान्य नागरिक-मजूरदार यांनी मोठ्या आस्थेवाईकपणे जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.

 

सकाळी साई सुभाष नांदेड येथून सकाळी सहा वाजता प्रतापराव पाटील -सिडको -किवळा कलंबर -सोनखेड -पारडी-लोहा-मार्गे धावरी फाटा-किरोडा-गोलेगाव पाटी-मार्गे कंधार असे त्याचे आगमन झाले लोह्यात यायला त्यांना दुपारी साडे तीन वाजले .

वाजतगाजत गावोगावी .. त्यांचे स्वागत.. औक्षण, फटक्याचीअतिषबाजी ,क्रेन ने भला मोठा पुष्पहार , ग्रंथतुला, असे विविध उपक्रम राबविले . जल्लोष… अविस्मणीय… वातावरण होते. बरोबर बाराच्या ठोक्याला” साई सुभाष ” कार्यकर्त्यांनी ..अलोट प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी फुलून गेले होते .सुविद्य पत्नी प्रतिभाताई , कन्या चिरंजीव, स्नुषा, नातवंडे , कुटुंबीय याच्या उपस्थितीत रात्रीच वाढदिवस साजरा झाला

 

प्रतापराव वाढदिवस

अभिष्टचिंतन शुभेच्छाचा वर्षाव झाला

  ” आपला हक्काचा माणूस ” ही ओळख या निमित्ताने अधिक घट्ट झाली

. सामान्य माणसाच्याअडीअडचणी जाणून त्या तळमळीने सोडविणारे प्रतापराव पाटील यांच्या सारखे आमदारअसणे मतदार संघाची गरज आहे असा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्या नंतर जागोजागी त्याचे शहरात जंगी स्वागत झाले .क्रांतिसूर्य बुद्ध विहारात त्यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . जिल्हाध्यक्ष देशमुख, आनंदराव शिंदे माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, दता वाले केशवराव मुकदम, संजय पाटील कऱ्हाळे, छत्रपती धुतमल ,हरिभाऊ चव्हाण, बालाजी खिल्लारे, करीम शेख दीपक पाटील कानवटे, सचिन मुकदम, नरेंद्र गायकवाड, नाना घंटे, राम पाटील कारेगाव, पत्रकार हरिहर धुतमल, गोविंद कदम, शेख मुर्तुज,जगदीश कदम, इमाम लदाफ, शिवाजी पांचाळ, फेरोज मणियार, प्रवीण धुतमल, सूर्यकांत गायकवाड, शहाजी पवार ,तुकाराम सुरनर, नामदेव बुद्धे, सतीश निखाते , बालाजी कळसकर, अनिल धुतमल,भास्कर पाटील, शोभाताई बगडे, संजय मोटे पाटील, सोनी क्लॉथ सेंटर,शेख सिकंदर, दता शेटे ,टी के दाढेल यासह असंख्य चाहत्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला.