नांदेड- माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड येथे दिनांक 22 जून 2024 रोजी ज्येष्ठ पौर्णिमा दिनी थायलंड येथून प्राप्त झालेल्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी आठ वाजता बुद्ध मूर्तीची मिरवणूक, दहा वाजता बुद्ध वंदना होईल आणि भिखु संघाची धम्मदेसना होईल. तसेच दुपारी तीन वाजता भोजनदान होईल.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भिखु शीलरत्न थेरो असून महाराष्ट्रातील ख्यातनाम भिखु संघाची धम्म देसाना होणार आहे. त्यात पूज्य भिखु प्रा. खेम धम्मो महाथेरो, पूज्य भिखु डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य भिखु सुमन वन्नो महाथेरो, पूज्य भिखु प्रा. डॉ. सत्यपाल महाथेरो, पूज्य भिखु पाय्याबोधी थेरो, पूज्य भिखु सुभूती थेरो,पूज्य भिखु अश्वजीत थेरो, पूज्य भिखु संघपाल थेरो, पूज्य भिखु रेवत बोधी, पूज्य भिखु गगनबोधि, पूज्य भिखूनी चारुशीला यांची धम्मदेशना होईल.

मा. आ. बालाजीराव कल्याणकर मा. डॉ. एस. पी. गायकवाड, मा. प्रणिती ताई चिखलीकर, मा. डॉ. यशवंतराव चावरे, मा. इंजि. नारायणराव जाधव, मा. प्रफुल्ल दादा सावंत, मा. प्रा. गौतम धूतडे, मा. रोशन अग्रवाल, मा. मिलिंद देशमुख, मा. प्रवीण साले, मा. ॲड.निलेश पावडे, मा. इंजि. यशवंतराव गच्चे, मा. पत्रकार पंढरीनाथ बोकारे, मा. माधवराव धुत, मा. ॲड.धम्मा कदम, मा. सचिन किसवे, मा. इंजी डॉ. भीमराव हाटकर, मा. इंजि. विनायक ढवळे, मा. विजयकुमार उजेडकर, मा. इंजि.रोहन राठोड, मा. गणपतराव गायकवाड, मा. डॉ. भास्कर दवणे, मा.डॉ. सिद्धार्थ जोंधळे, इंजिनिअर चंदाताई बुक्तरे, सुरेश महाबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबराव गायकवाड, राजेश बिऱ्हाडे,जयाताई सूर्यवंशी, मंगलबाई कवडे,भीमाबाई गजभारे, तुळसाबाई शेरे,पुष्पाताई भरणे, कल्पना वोहाळ, रेखा कोकरे सोपान काळबांडे हे परिश्रम घेत आहेत.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा सहयोग नगर नांदेड,बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेड आणि माता रमाई आंबेडकर महिला मंडळ सहयोग नगर नांदेड यांनी केली आहे.