
चंद्रकलाबाई वाघमारे यांचे दुःखद निधन
२७ मे रोजी नांदेड मध्ये अंत्यसंस्कार
नांदेड, येथील हर्षनगर भागातील ज्येष्ठ नागरिक चंद्रकलाबाई वाघजी वाघमारे यांचे आज संध्याकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. येथील महात्मा फुले हायस्कूल मधील सहशिक्षक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत चंद्रकलाबाई वाघजी वाघमारे यांची उद्या सकाळी अकरा वाजता अंतयात्रा हर्षनगर येथून निघून दिनांक २७ मे २०२४ रोजी नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत चंद्रकलाबाई वाघमारे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू असा परिवार आहे.