यापूर्वीची कामेही चौकशीच्या फेऱ्यात निवडणुका लक्षात घेता कामांसाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न

नांदेड : महापालिकेच्यावतीने २०२२- २३ साठी दलितवस्ती निधीअंतर्गत प्रस्तावित केलेल्या ११५ कामांना ब्रेक बसला असून, कामासंदर्भात होत असलेल्या तक्रारीनंतर निविदा स्तरावरच ही कामे थांबविण्यात आली आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता, ही कामे पूर्ण व्हावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अधिकारी आता ताकही फुंकून पित आहेत.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अर्थात दलित वस्ती योजनेच्या निधीतून शहरातील सर्वसाधारण वस्तीत कामे करण्याचा नवा पायंडा महापालिकेने दोन वर्षांपासून सुरू केला आहे. याबाबत महापालिकेतील सत्ताधारी पक्षात मागासवर्ग प्रभागातून निवडून आलेले नगरसेवकही तोंडावर बोट ठेवून आहेत.

दुसरीकडे दलित वस्तीचा निधी दलित वस्त्यांमध्ये खर्च न करता इतर ठिकाणी खर्च केल्याप्रकरणी साहेबराव गायकवाड अनुसूचित जाति मोर्चा महानगर यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने

जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर मागवले आहे.

हे उत्तर पाठवण्यासाठी आयोगाकडे १० दिवसांची मुदतवाढ साठी विनंती प्रशासनाने केली होती. मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतरही दलित वस्ती प्रकारात उत्तर गेले नसल्याची बाब पुढे आली आहेत. २०२२-२३ च्या २१ कोटी निधीआहे. त्यामुळे ही कामे इतर भागात दलित वस्ती सोडून इतर ठिकाणी ११५ कामे प्रस्तावित केली आहेत का? हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.ही कामे चर्चेला आला आहे. सहायक एकत्रित न करता स्वतंत्रपणे प्रस्तावित आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समाज करण्यात आली आहेत. कल्याण विभागाच्या एका पथकाने कामांची पाहणी केली. त्या पाहणीचा अहवालही अद्याप गुलदस्त्यातच आहे. एकूणच या सर्व तक्रारी चौकशीच्या अनुषंगाने आगामी कालावधीत दलित वस्ती निधीतील कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकू नये, यासाठी निविदा स्तरावरच कामे थांबविण्यात आली

यापूर्वी दलित वस्ती निधीतील कामे एकत्रित करत १ ते ५ कोटींपर्यंतची कामे हाती घेण्यात आली होती. ही कामेही दलित वस्तीत न करता सर्वसाधारण लोकवस्तीच्या भागामध्ये करण्यात आली. यामुळे शहरातील खऱ्या दलित वस्त्या मात्र विकास कामापासून वंचितच राहिल्या.

आठवलेंच्या आदेशानंतरही चौकशी पुढे जाईना

■ या प्रकरणात केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले नांदेड दौऱ्यावर आले असता माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार माननीय आठवले त्यांनीही दलित वस्ती कामासंदर्भाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तक्रारकर्ते साहेबराव गायकवाड यांनी दलित वस्ती चा निधी इतरत्र वळविण्यात आल्या बाबत सांगितले यावरून या बैठकीत दलित वस्तींचा निधी इतरत्र खर्च होत असेल तर ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशीही कुठपर्यंत आली याबाबत मौन बाळगले जात आहे.