
नांदेड : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ढिसाळ कारभार सुरू आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्ञान स्त्रोत केंद्रात विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे येथे विजेची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी वारंवार करीत आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराला विद्यार्थी वैतागले आहेत.
विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्रात रात्री उशिरा पर्यंत विद्यार्थी अभ्यास करीत असतात मात्र सदरिल हाॅल मध्ये विजेची वेवस्था निट नसल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करताना अंधार पडत असतो. त्यामुळे येथे विजेची वेवस्थित सोय करावी.यासाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा कुलगुरूकडे निवेदनाद्वावरे मागणी देखील केली होती. मात्र गेंड्याच्या कातडीच बनलेल विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांच्या मागणी कडे लक्षच देत नसल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करताना मोबाईल टाॅर्च चा आधार घ्यावा लागतोय. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यामुळे कुलगुरूनी ज्ञान स्त्रोत खोलीत विजेची चांगल्या प्रकारे सोय करावी. आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असलेला अंधार दुर करून ज्ञानस्त्रोत केंद्र प्रकाशमय करण्यासाठी तात्काळ विजेची सोय करावी अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
दि २२ फेब्रुवारी पासून विद्यापीठातील विविध संकुलाच्या परिक्षा होणार आहेत.त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरा पर्यंत येथे अभ्यास करीत आहेत.मात्र या ज्ञानस्त्रोत केंद्रात फक्त एकाच बाजूने बल्प बसवले असल्याने प्रकाश खुप कमी असतो.त्यामुळे हाॅल मध्ये सर्वत्र अंधार पसरतो. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करीत असताना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्ञानस्त्रोत केंद्रातील दोन्ही बाजूने व मध्यभागी बल्प बसवले तरच संपुर्ण हाॅल मध्ये प्रकाश योग्य रित्या पडतो आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोयीचे होईल. त्यामुळे कुलगुरू उद्धव भोसले हे विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे आत्ता तरी लक्ष देतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.