【अराजकता माजवून;सत्तेचा माज दाखवू नका -खा प्रतापराव पाटील चिखलीकर 】

नांदेड:

पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेस विजयानंतर सत्ता स्थापन होण्यापूर्वीच सत्तेचा गैरवापर करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचा प्रकार सुरू केला आहे.

नुकत्याच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका पार पडल्या,तृणमूल ने विजय मिळविलेला आहे,याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अभिनंदनही केले,निवडणुकीत जय-पराजय मिळत असते,पराजय म्हणून निराश व्हायचेच नसते…

तसेच विजय झाल्यानंतर उन्माद ही माजवायचा नसतो,परंतु तृणमूल पाठीराख्यांनी सर्व राजकीय सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजप कार्यकत्यांचे खून तर महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आले,इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील एकही मंत्री व पदाधिकारी यावर भाष्य करत नाही,व निषेध सुद्धा केलला नाही,याचाच अर्थ या हल्ल्यांना शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी या पक्षांची मूक संमती आहे हे सिद्ध होते,कारण निकालाच्या दिवशी या “महाविकास आघाडीच्या रिक्षा सरकारचे” सर्व मंत्री व पदाधिकारी,नेते मंडळी यांनी तर ममता दीदी वाघीण म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला होता,आणि आता तीच ममता दीदी डाईन(क्रूर) बनली तर एकही जण बोलण्यास तयार नाही असे का?

पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे नांदेड महानगर भाजपचे सर्व पदाधिकारी ठामपणे उभे असून या हल्ल्याच्या तसेच याबाबत मूग,गिळून गूपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी “तिघाडी सरकारच्या” तीनही पक्षांचा बंगाल सरकार समवेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे,जिल्हाधिकारी महोदय यांनी आमच्या तीव्र/संतप्त भावना महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात,ही विनंती एका निवेदनाद्वारे करण्यात आली,यावेळी खासदार प्रतापराव पा.चिखलीकर,जिल्हाध्यक्ष प्रविण साले,संघटनमंत्री गंगाधर जोशी,विजय गंभीरे,सरचिटणीस दिलीप ठाकूर,व्यंकट मोकले,उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी,सुशिल चव्हाण,चिटणीस मनोज जाधव,मंडळाध्यक्ष हरभजनसिंघ पुजारी,राज यादव,केदार नांदेडकर,किर्ती छेडा,महादेवी मठपती,लक्ष्मी वाघमारे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते…

बंगालच्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो,राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी यांनी काल या हल्ल्यातील भाजपा पदाधिकारी जखमी व मृत बांधव,भगिनी,माता यांची सांत्वनपर भेट घेतली,या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी,व बंगाल मधील शोषित,पीडित भाजप बांधवाना न्याय मिळावा यासाठी आम्ही खंबीरपणे त्या सर्व बांधवांच्या पाठीशी उभे आहोत,आगामी गरज भासल्यास लोकप्रिय खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या नेतृत्वात बंगाल मध्येही ममतांच्या सरकार समोर निदर्शने करू,या निषेध आंदोलनासाठी नांदेड भाजपा टीम खंबीर आहे…