
नांदेड (प्रतिनिधी) डॉ. आंबेडकर चौक, सिडको कॉर्नर नांदेड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, गोदावरी तीरावर विश्वशांतीदूत तथागत भगवान बुद्ध यांची विशाल प्रतिमा स्थापन करून येथे उद्यान विकसित करावे, कारेगाव फाटा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे यासह सहा विषयांचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध विषयांचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आढावा घेण्यात आला. मानसपुरी ते बहाद्दरपूरा रोड नॅशनल हायवेला जोडून राहिलेल्या रस्त्याच्या कामासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. लातूर फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा राष्ट्रीय महामार्गाने बांधित होत असल्याने या पुतळ्यासाठी याच भागात महामार्गालगत जागा अधिग्रहित करून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारतानामानमुखेड- विदर पायाच्या कामाला गती या काळा गडगा रोडवरील मातरम गील शिल्लक राहिलेल्या रस्त्याचे काम त्वरित करावे, मागरम बद्री रोडवरील पांदण रावाला यावा नागा तालुक्यातील गांगवी येथील विविध समस्यांचे निराकरण करण्यात पाच नदिड तालुक्यातील वाडी येथे नगरपंचायत स्थापन याच्या अनुषंगाने आणि धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनुषंगानेही या बैठकीत आढावा घेण्यात आली.
येथे गोदावरी तीरावर संकल्पित विपश्यना केंद्र आणि तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती स्थापना करण्यासाठी पर्यटन क्षेत्र विकासाच्या निधी मंजूर करण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे .त्यामुळे १०० कोटींच्या कामांचा प्रकल्प अहवाल त्यति सादर करावा, असे निर्देश खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना दिले आहेत, लातूर फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेच्या अधिग्रहणाबाबत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी अहवाल सादर करावा या पुतळा उभारणीच्या कामाला तो चाके असेह खा. चिखलीकर यांनी सुचविले. जिल्ह्यातील विविध विकास कामांना नियोजित वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना यावेळी खा. चिखलीकर यांनी दिल्या आहेत.
या बैठकीला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश खडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, भाजपाचे मानी महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड , बी आर एस चे नेते सुरेशदादा गायकवाड आदींची उपस्थिती होती.