
स्वा.रा.ती.म. विद्यापीठ प्रशासनाच्या अन्यायकारक मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांचे खंडपीठाकडे धाव
नांदेड:. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट 2022 परीक्षा पार पडली त्या परीक्षेमध्ये परीक्षा केंद्र प्रमुख व परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक व प्र कुलगुरू यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांना मोकळीक देऊन मास कॉपी करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा दालनात मोठ्या प्रमाणात खुल्या प्रकारे चर्चा करून विद्यार्थी पेपर सोडवले गेले होते. अनेक विद्यार्थी परीक्षेमध्ये मोबाईल घेऊन इंटरनेटवरही उत्तरे शोधत होते. सदरील प्रकारात मा.परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहेत दिसून येत आहे. एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेकडून तात्काळ त्या सदरील गंभीर प्रकाराविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यार्थी 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसले होते व 30 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. विद्यापीठाकडून संघटनेला त्या निवेदनाला अनुसरून गोलमाल करत उत्तरही मिळाले होते. परिक्षेचा निकाल लागून चार महिने होऊन गेले. एकुण 39 विषय असून त्यामधील काही विषयांचे चुकीचे प्रश्न होते त्यांचे सुद्धा गुण अतिरिक्त गुण म्हणुन देण्यात आलेले नाहीत.हि विद्यापीठ प्रशासनाची चुक आहे.UGC च्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचे उत्तर पत्रिका सुद्धा देण्यात आलेल्या नाहीत. या सर्व प्रश्नांना कानाडोळा करत प्रशासनाने 01 डिसेंबर पासून प्रथम RAC सुद्धा घेण्यात सुरुवात केली आहे.
मा. कुलगुरू , प्र कुलगुरू, परीक्षा संचालक यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांना अरे- तुरीची उद्धट प्रकारची भाषा वापरून विद्यार्थ्यांना हाकलून देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून गेल्या पाच महिन्यापासून खूप मानसिक त्रास होत आहे या त्रासाला कंटाळून विद्यार्थी खंडपीठामध्ये याचीका दाखल करण्यात येत आहे.
SFI संघटनेने अनेक निवेदन, आंदोलने, उपोषण करून सुद्धा प्रशासन या गंभिर प्रकरणाकडे जाणिवपुर्वक टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केले आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. न्याय न मिळाल्यास दोन दिवसात खंडपिठात याचीका दाखल करण्यात येईल. – काँ. विशाल भद्रे (SFI जिल्हा उपाध्यक्ष नांदेड)
प्रशासनाला या विषयाबद्दल वेळीच पूर्व सुचना लेखी निवेदनातून देण्यात आली होती. प्रशासनाने कोणतीच समिती गठित न करता हवेत उत्तरे देत असून कुलगुरू यांनी विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती. या विषयाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थी आत्महत्तेचाही प्रयत्न केला होता. –. चंचल पाटील (विद्यार्थी)