
भाजपाने दिले आयुक्तांना निवेदन
नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीने निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. महानगरपालिकेने नुकताच रौप्य महोत्सव साजरा केला तो रौप्य महोत्सव एका पक्षाचा होता अशी परिस्थिती मनपामध्ये निर्माण झाली आहे. एकीकडे विकास कामे करण्यासाठी, लाईट बिल भरण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत पण रौप्य महोत्सवावर करोडो रुपये खर्च केले. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी मनपाचे कंत्राटदार, गुत्तेदार, बांधकाम व्यवसायिक, ट्युशन क्लासेस वाले यांच्याकडून देणग्या गोळा केल्या. मनपाला अशा देणग्या गोळा करता येतात का ? गोळा केलेल्या निधीचा वापर हा चांगल्या कामासाठी म्हणजे अत्यावश्यक बाब गोदावरी नदी शुद्धीकरण, स्मशानभूमी, पिण्याचे पाणी यावर खर्च करायला पाहिजे पण रौप्य महोत्सवाच्या नावाखाली करमणुकीचा कार्यक्रमासाठी देणगीदारांची पैसे खर्च का केले ? देणगीदारांची नावे व देणगी रक्कम याबाबत देखील निवेदनात माहिती मागवली आहे. तसेच दलित वस्ती मधील मनमानी वर दलित वस्ती निधीचा दलीतेत्तर वस्ती मध्ये निधी खर्च का केला ? तय बाजारीच्या नावावर हातगाडी, फेरीवाले यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करण्यात येत आहे. वीस रुपया ऐवजी कंत्राटदार गरीब फेरीवाल्याकडुन पन्नास रुपये वसूल करत आहेत. अशा अनेक विषयाबाबत मनपाला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
या वेळी विरोधी पक्ष नेता दीपक सिंह रावत, चैतन्य बापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते,महेश खोमणे,राजू गोरे, संजय घोगरे, सौ वैशाली मिलिंद देशमुख, दिलीप सिघ सोडी, विजय गंभीरे, व्यंकट मोकले, कामाजी पाटील, परमविर सिंह मल्होत्रा, अनिल सिंह हजारी, शततारका पांढरे, साहेबराव गायकवाड, अमोल कुलथिया,गजानन कट्टे, मारोती वाघ, संदीप कऱ्हाळे, अंबादास जोशी, अभिलाष नाईक, प्रेम कुमार फेरवाणी, चंचल सिह जट, राज यादव, अक्षय अमिलकठवार भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.