मुंबई दि. ६ : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले, त्याच्या निधनाने राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाने केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला आहे तर राज्य सरकारने दुखवटा म्हणून राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

 

राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ ( सन १९८१ चा अधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.