मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील महाविद्यालये राज्य सरकारने बंद केली होती, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने पुन्हा राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागातील शाळा सोमवारपासून ऑफलाईन पध्दतीने सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्यात येणार आहे. उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारी पासुन ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत त्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण असणे आवश्यक असणार आहे. शाळेनंतर आता महाविद्यालये सुरू करण्याच्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.