
साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने ५५ लक्ष रुपयाच्या कामांना मंजुरी
नांदेड – भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विकास निधीतून सहयोग नगर, इंदिरा नगर मधील मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन ११ रोजी सहयोग नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
सहयोग नगर, इंदिरा नगर मधील नागरिकांच्या मागणीनुसार साहेबराव गायकवाड यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून गणपती मंदिर ते नागेंद्र अलशेट्टी यांच्या घरापर्यंत नालीवरील छत, सिनू यांच्या गिरणी समोरील रस्ता व नाली,भिमराव सोनाळे यांच्या घराशेजारील बोळी मधील अंतर्गत रस्ते, नाली इंदिरा नगर मधील सीसी रस्ता आदी कामाचे ५५ लक्ष रुपयांच्या कामाचे मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व निधी मंजूर करून दिला या निधी मधील कामांचे भूमिपूजन सहयोग नगर मधील ज्येष्ठ नागरिक व मित्रपरिवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने सहयोग नगर मधील सर्व नागरिकांकडून भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे.
सदरील भूमिपूजन कार्यक्रमास नारायणराव ढेपे, राजेश बिऱ्हाडे, उतकर काका, रमेश कोकरे, भिमराव सोनाळे संजय मांजरमकर, प्रतिसाद खरात, सुरेश इंगोले, तात्या गुरु मनाठकर, शंकरराव साळवे, विश्वनाथ पाटील, गरुड अण्णा, महेश एडके, गोपी कांबळे, गौरव मनाठकर, राहुल कदम, माधव वैद्य, अमित गोडबोले, यश गायकवाड, चेतन कांबळे, पियुष लोणे, प्रणव आठवले, रोहित खंदारे, जब्बार शेख, सतीश वैद्य, तेजस राऊत, जय राऊत, ओम जगळपुरे,सिनू , सोपान काळबांडे, नितीन शिरसागर,फाजील भाई, यांच्या सह नगरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थिती होती.