श्री युवा एकता दुर्गामाता नवरात्र मंडळ कैलासनगर नांदेड यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

मा.नगरसेविका सौ.वैशाली मिलिंद देशमुख, भाजपा महानगर सरचिटणीस मा.साहेबराव गायकवाड, नगरसेविका सौ.अपर्णा नेरलकर, आनंद पावडे, हिरामण देसाई, दत्ता भोसले, प्रदीप सरोदे, आबाजी पावडे,यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

 

 

या शिबिरात मंडळातील शिवा नागरगोजे, विशाल साबणे, आकाश सावंत, सुरेश जमदाडे, आशिष भवरे, पवन कोळनुरे, विश्वजित साबणे, सोहन टोम्पे यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून रक्तदान करुन घेतले. नांदेड शहरातील सर्वात जास्त रक्त संकलित केलेले मंडळ म्हणून सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.