नांदेड : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स सदस्य निवडणुकीचा निकाल लागला असून 30 जुलै 2024 रोजी संसद सभागृहात मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यसभेचे पाच सदस्य निवडून आले आहेत .यात नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित माधवराव गोपछडे यांची एम्स (AIIMS) नागपूर सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

एम्स च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खा. अजित गोपछडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात पूढील काळात सकारात्मक कार्य आणि धोरणात्मक निर्णय घेतले जातील असा विश्वास एम्स चे नवनिर्वाचित सदस्य डॉ. गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.