
नांदेड : नांदेड महानगर पालिकेतील पथदिवे मागील दहा दिवसांपासून बंद आहेत महानगरपालिकेने दिवे तात्काळ चालू करावेत,अशी मागणी भाजपा च्या वतीने करण्यात आली होती पण नांदेड महापालिकेने याची दाखल न घेतल्यामुळे मनपा आयुक्ताला कंदील भेट देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदेड भाजपाच्या वतीने देण्यात आला होता.नांदेड महानगरात मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी संपूर्ण देशभरातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत.शहराचा विस्तार चौफेर झालेला असल्यामुळे नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी रात्री-बेरात्री प्रवास करावा लागतो,पण पथदिवे बंद असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. महिला,युवा, वयोवृद्ध घराबाहेर पडले तर चोरीचे प्रमाण वाढले आहे,मोठ्या प्रमाणावर दुचाकी गाड्यांच्या चोऱ्या होत आहेत. नशा-पाणी करणारे युवक रस्त्याच्या दुतर्फा मद्यपान करत असतात अशा परिस्थितीत रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच नागरिक हैराण असतात अशातच संवेदनहिन प्रशासनाच्या भूमिकेमुळे पथदिवे बंद करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिल भरणा करण्या बाबतीत आधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विजेचे पंप बंद पाडले, जबरदस्ती वीजबील भरणा करून घेतला,आता शहरी भागात साठ टक्के पेक्षा जास्त मालमत्ता धारक कर भरत असताना पथदिवे बंद का आहेत? याचा खुलासा करावा व पथदिवे तात्काळ चालू करावेत असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे. उद्या दि. 7 मार्च रोजी खा.प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात कंदील आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती पत्रकात दिली आहे.